Created by: Bharati Web
नमस्कार,
मी मेधा पूरकर
संस्थापक, मैत्र ग्रुप.
फेब्रुवारी 2016 पासून पुण्यात "मैत्र " नावाची संस्था स्थापन झाली.मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री-पुरुषांना एकत्र आणून, त्यांच्यात समूह भावना निर्माण करण्याचं, विविध विषयातील तज्ञांकडून मार्गदर्शन देऊन माणूस म्हणून त्यांना समृद्ध आणि सक्षम करण्याच काम ही संस्था करते.मैत्र चे एकूण 9 गट असून गटात 200सदस्य आहेत.समाजाभिमुख सकारात्मक विचारांचे पोषण करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम ही संस्था करीत आहे. महिन्यातून एकदा मैत्र सदस्य गटशः एकत्र येतात.
"शब्दविणे संवादु" साधायला आपण ज्ञानेश्वर माऊलीं इतके थोर नक्कीच नाही हेच लक्षात घेऊन, "मैत्र" आपल्या सभासदांना बोलून मन मोकळं करण्याची संधी उपलब्ध करून देते. कारण "मैत्र" बोलणाऱ्यांचा कान आहे. अनेक सामाजिक संस्थानशीही मैत्र चं नातं निर्माण झाले आहे.
जनकल्याण रक्तपेढी आणि मैत्र यांचे नाते मैत्रच्या सदस्यांच्या रकतपेढी भेटीतून निर्माण झाले. समाजभान जपून समाजाप्रती दायित्व ठेवणे हेच या दोन्ही संस्थांचे उद्दिष्ट! रक्त आणि रक्त घटकांची गरज विविध आजारांमध्ये रुग्णांना लागत असते.
Thalassemia हा आजार लहान मुलांमध्ये आढळून येतो या आजारात रक्ताची गरज भासते. त्यासाठी रक्तपेढी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने,सुरक्षित रक्त Thalassemia मुलांपर्यंत विना मोबदला पोहोचवत आहे. या आजारात काही मुलांना महिन्यातून एकदा किंवा दोनदा रक्त शरीरात भरून घ्यावे लागते कारण,नैसर्गिकरित्या रक्त त्यांच्या शरीरात निर्माण होत नाही. अनेक लोकांच्या आर्थिक सहकार्यामुळे या मुलांना रक्तपिशवी मोफत देणे शक्य होते.
मैत्र या संस्थेने ही अन्नदान, सायकल दान करत समाजिक बांधिलकी जपली आहे. मुलांकरिता सुद्धा मैत्र काम करणार आहे. येत्या वर्षातील दिवाळीपर्यंत किमान 20 ते 25 मुलांसाठी चा आर्थिक खर्चासाठी हातभार लावण्याचा मैत्रचा मानस आहे. त्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं असे आवाहन जनकल्याण रक्तपेढी आणि मैत्रीच्या वतीने आम्ही करत आहोत.
Namaskar
I am Medha Purkar
Founder, Maitra Group
Established in February 2016 in Pune, "Maitra" is an organization dedicated to fostering unity among middle-class individuals, both men and women. With a membership of 200 individuals divided into nine groups, Maitra aims to enrich and empower its members through expert guidance across various subjects. The organization convenes monthly group meetings to facilitate open dialogue and camaraderie among its members.
While acknowledging that they may not achieve the same level of eloquence as Dnyaneshwar Mauli in "Shabdwani Samvadu," Maitra provides a platform for members to express themselves freely, knowing that their friends in Maitra will always lend a supportive ear. Over the years, Maitra has forged connections with several social institutions, including the Jankalyan Blood Centre.
The partnership between Maitra and the Jankalyan Blood Centre blossomed from Maitra members' visits to the centre, driven by a shared commitment to social consciousness and responsibility. The crucial need for blood and its components, especially for patients with diseases like Thalassemia, underscores the importance of their collaboration. Children afflicted with Thalassemia require frequent blood transfusions, often every month, due to their bodies' inability to produce blood naturally. Through the concerted efforts of blood centres and modern technology, safe blood is provided to these children at no cost, thanks to the generous financial support of many individuals.
In addition to supporting blood donation initiatives, Maitra extends its social commitment by donating food and bicycles. Looking ahead, Maitra aims to assist children further, intending to alleviate the financial burden of at least 20 to 25 children by Diwali next year. They appeal to the community to join hands in this noble endeavor on behalf of the Jankalyan Blood Centre and Maitra.